लखीमपूर घटनेचा निषेधच, बंदला पाठिंबा - राजू शेट्टी - lakhimpur news
🎬 Watch Now: Feature Video
जालना - लखीमपूर येथे घटलेल्या घटनेचा निषेध असून महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला आमचाही पाठिंबा आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. ते जालना जिल्ह्यातील वाडिगोद्री येथे बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा सुरू आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मावळ घटनेचा निषेध करत असतील तर लखीमपूर घटनेचाही निषेध करायला हवा. शेतकऱ्यांच्याबाबतीत राजकारण करू नये, असेही शेट्टी म्हणाले.