ST employees agitation : कोल्हापुरातील खासगी वाहतुकदारांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला पाठिंबा - kolhapur latest news
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - एकीकडे राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST employees agitation) सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे आणि म्हणूनच राज्य सरकारने खासगी बसेसचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बसस्थानकात आता पोलीस बंदोबस्तात खासगी बसेस दिसत आहेत. मात्र, कोल्हापुरात खासगी बस वाहतूक संघटनेनेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत असून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या विरोधात आम्ही जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.