OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरून तापलं राज्यातील राजकारण, पाहा कोण काय म्हणालं.. - राजेश टोपेंची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापायला लागलं. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या सध्याच्या परिस्थितीला राज्यसरकारची निष्क्रियता जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. तर भाजपाच्या कार्यकाळात झालेल्या चुकांमुळं ओबीसींच आरक्षण रद्द झालं, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आज ओबीसी आरक्षणावरून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनंदेखील करण्यात आली आहे. एकंदरीतच ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकारण सुरू आहे.