मालवणला जाणारी बस आगीत जळून खाक; चालकानं समयसूचकता दाखविल्यानं ३४ प्रवाशांचे वाचले प्राण - MUMBAI GOA HIGHWAY ACCIDENT

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

रायगड- काळ आलेला होता. मात्र, चालकानं प्रसंगावधान दाखविल्यानं काळाची वेळ आली नव्हती, असा अनुभव खासगी बसमधील प्रवाशांना आला. मुंबई- गोवा महामार्गावर कोलाड येथे अचानक आग लागून खासगी प्रवासी बस खाक झाली. रात्री 12 वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बससह प्रवाशांचे बसमधील साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्‍नीशमन दल , कोलाड रेस्‍क्‍यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले.  खापरोबा ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्‍वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्‍वे पुलाजवळ आली असता बसच्‍या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्‍हां ड्रायव्‍हरने गाडी थांबवून पाहिले असता बसनं मागील बाजूस पेट घेतल्‍याचं दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्‍यात आले. त्‍यानंतर आगीचा भडका उडाला. बसमध्‍ये चालक आणि क्लिनरसह 34 प्रवासी होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.