मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीचे ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाची बातमी आली आहे. एक महान दूरदर्शी व्यक्तीमत्व असलेल्या बेनेगल यांच्या निधनानं हिंदी सिनेसृष्टीला मोठा हादरा बसला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. या रुग्णालयात त्यांच्यावर मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या बातमीला त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकाराणापासून सर्वच क्षेत्रातील मान्यवर लोक त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
We are deeply saddened by the passing of legendary filmmaker, Shyam Benegal, a towering figure in Indian cinema and a true pioneer of the parallel cinema movement. His tremendous contributions to the art form, marked by thought-provoking storytelling and a profound commitment to… pic.twitter.com/g4p7NBmTxf
— Mallikarjun Kharge (@kharge) December 23, 2024
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बनेगल यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिलंय, "भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि समांतर चित्रपट चळवळीचे खरे प्रणेते, दिग्गज चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनानं आम्हाला खूप दुःख झालं आहे. विचारप्रवर्तक कथाकथन आणि सामाजिक समस्यांशी प्रगल्भ बांधिलकी यांनी चिन्हांकित केलेल्या कला प्रकारातील त्यांचं जबरदस्त योगदान अमिट छाप सोडतं. पंडित नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर आधारित ‘भारत, एक खोज’ आणि संविधान सभेच्या चर्चेवर आधारित ‘संविधान’ या मालिका या त्यांच्या कलाकृती तरुण प्रेक्षकांसाठी एक मौल्यवान संदर्भबिंदू आहेत. 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह प्रतिष्ठित पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, त्यांचा वारसा चित्रपट निर्मात्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना आमच्या मनःपूर्वक संवेदना."
Mourning the passing of #ShyamBenegal, a giant of India’s New Wave cinema who leaves a considerable body of cinematic accomplishment behind. My sisters and i knew him since our childhood, when he was an advertising professional who photographed them as the first “Amul Babies”.… pic.twitter.com/oKw8iIpJee
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 23, 2024
काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर यांनी श्याम बेनेगलाना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोक संदेशात लिहिलंय, "श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे, भारतातील न्यू वेव्ह सिनेमाचा एक दिग्गज, ज्यांनी अनेक सिनेमॅटिक कामगिरी मागं ठेवली आहे. माझ्या बहिणी आणि मी त्यांना आमच्या लहानपणापासून ओळखत होतो, जेव्हा ते एक जाहिरात व्यावसायिक होते आणि त्यांनी त्यांचे पहिले “अमूल बेबीज” म्हणून फोटो काढले. त्याचा प्रभाव कायम राहील, पण त्याचे जाणे हे चित्रपटसृष्टीचे आणि मानवतेचे मोठे नुकसान आहे. ओम शांती."
श्याम बेनेगल जी का जाना फ़िल्म जगत के लिए एक अपूरणीय क्षति है।
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 23, 2024
उत्कृष्ट फिल्मकारों की श्रेणी में उनका नाम हमेशा विशेष सम्मान के साथ लिया जाएगा।
'भारत एक खोज' जैसी अद्भुत शृंखला और 'मंथन' एवं 'अंकुर' जैसी फिल्मों से वे हमेशा हमारे दिलों में रहेंगे।
विनम्र श्रद्धांजलि! pic.twitter.com/zYpcZvCpYl
भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली. "श्याम बेनेगल यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांच्या श्रेणीत त्यांचे नाव नेहमीच विशेष आदराने घेतलं जाईल. 'भारत एक खोज' सारख्या अप्रतिम मालिका आणि 'मंथन' आणि 'अंकुर' सारख्या चित्रपटांमुळे ते नेहमीच आपल्या हृदयात राहतील.", असं म्हणत तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
8 बार नेशनल फिल्म अवॉर्ड से पुरस्कृत होने वाले प्रसिद्ध फिल्मकार श्री श्याम बेनेगल जी के निधन से गहरा दुःख हुआ है।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) December 23, 2024
फिल्म जगत में उनके अतुलनीय योगदान के लिए उन्हें पद्म श्री तथा पद्म भूषण से सम्मानित किया गया था जो उनकी कला के प्रभाव को दिखाता है।
भारत एक खोज के तौर पर…
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय की, "8 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनानं खूप दुःख झालं. चित्रपट उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हे त्यांच्या कलेचा प्रभाव दर्शविते. 'भारत एक खोज' त्यांनी सर्वसामान्यांसमोर मालिकेच्या रूपात एक पुस्तक ठेवले जे पिढ्यांना भारताची संस्कृती आणि त्या काळातील संघर्षांबद्दल तपशीलवार सांगेल. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो."
पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, आर्ट फिल्मचे जनक मानले जाणारे ज्येष्ठ सिने निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Arun Lad (@NCPArunLad) December 23, 2024
'भारत एक खोज' सारख्या अप्रतिम मालिका आणि… pic.twitter.com/6tIe8KcPY3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अरुण लाड यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलंय, "पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, आर्ट फिल्मचे जनक मानले जाणारे ज्येष्ठ सिने निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. 'भारत एक खोज' सारख्या अप्रतिम मालिका आणि 'मंथन' 'निशांत'आणि 'अंकुर' सारख्या चित्रपटांमुळे ते नेहमीच सिने रसिकांच्या स्मरणात राहतील."
कला फिल्मों का एक युग समाप्त; प्रसिद्ध फिल्म निर्देशक, पटकथा लेखक और निर्माता श्याम बेनेगल का सोमवार को मुंबई में निधन हो गया है। 14 दिसंबर को ही उन्होंने 90वां जन्मदिन मनाया था।#shyambenegal pic.twitter.com/jRbWnCx6GS
— Mukesh Mathur (@mukesh1275) December 23, 2024
श्याम बेनेगल यांची उत्तुंग कारकिर्द
1970 आणि 1980 च्या दशकात 'अंकुर', 'निशांत' आणि 'मंथन' यांसारख्या श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांसह भारतातील समांतर चित्रपटांनी एक चळवळीचं स्वरुप घेतलं होतं. आपल्या शानदार कारकिर्दीत बेनेगल यांना चित्रपट क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बनवलेल्या चित्रपटांसाठी त्यांना तब्बल 8 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले होते.
श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये 'अंकुर' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. यामध्ये अनंत नाग आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला समीक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या चौकटी बाहेरच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि बेनेगल हे नाव वेगळ्या अर्थानं प्रस्थापित झालं. त्यांनी बनवलेला कारकिर्दीतील तिसरा चित्रपट होता 'निशांत' ! 1975 मध्ये आलेल्या या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्येही झेंडा रोवला होता. कान्समध्ये या चित्रपटाला पाल्मे डी’ओरसाठी नामांकन मिळाल्यानं सर्वांच्या नजरा या दिग्दर्शकानं वेधून घेतल्या. 'निशांत' चित्रपटामध्ये गिरीश कर्नाड, शबाना आझमी, अनंत नाग, अमरीश पुरी, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या.
श्याम बेनेगल यांनी सर्जनशीलपणे बनवलेल्या चित्रपटाच्या यादीवर एक नजर जरी टाकली तर त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहात नाही. 'मंथन', 'भूमिका: द रोल', 'जुनून', 'आरोहण', 'नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो', 'वेल डन अब्बा', 'मम्मो', 'सरदारी बेगम' आणि 'झुबेदा' असे एकाहून एक सरस कलाकृती त्यांनी बनवल्या आणि प्रेक्षकांना समृद्ध केलं. त्यांच्या आजवरच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि नंतर 1991 मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.