ETV Bharat / entertainment

संजय लीला भन्साळी यांचे पाहिलेच पाहिजेत असे ५ चित्रपट - SANJAY LEELA BHANSALI BIRTHDAY

संजय लीला भन्साळी आज आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. उत्तम निर्माता दिग्दर्शकन म्हणून त्यांचं काम पाहायचं असेल तर हे पाच चितर्पट पाहायलाच पाहिजेत.

Sanjay Leela Bhansali
संजय लीला भन्साळी ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 24, 2025, 4:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे अतिशय कल्पक, प्रतिभावान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या उत्कृष्ट कलात्मक चित्रपटांसाठी ओळखले जातात. भन्साळींच्या चित्रपटांमध्ये अभिनयाचा दर्जा आणि कला यांचा संगम पाहायला मिळतो. आजवर त्यांनी मुख्यतः रोमँटिक चित्रपटांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं. संजय लीला भन्साळी यांनी ८० च्या दशकाच्या अखेरीस बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी १९९६ मध्ये पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत कधीच मागं वळून पाहिलं नाही. आज २४ फेब्रुवारी रोजी संजय लीला भन्साळी त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी आपण त्यांचा निवडक पाच चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत.

हम दिल दे चुके सनम

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांची मनोरंजन जगताला नव्यानं ओळख झाली. या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात सलमान आणि ऐशची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि आजही सलमानचे चाहते या चित्रपटाला त्याच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असल्याचं समजतात.

देवदास

सलमान खाननंतर संजय लीला भन्साळी यांनी २००२ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्याबरोबर काम केलं. त्यांनी शाहरुखला घेऊन देवदास या चित्रपटाची निर्मिती केली. शाहरुख खानच्या कारकिर्दीतील हिट लिस्टमध्ये 'देवदास' या पिरियड रोमँटिक ड्रामा चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. यात शाहरुख त्याच्या शेजारी राहात असलेल्या पारोच्या (ऐश्वर्या राय) च्या प्रेमात पडतो. परंतु त्याच्या प्रेमकथेत अडथळे येतात आणि निराशेच्या गर्तेत गेलेला देवदास आपले जीवन संपवण्याच्या मार्गावर निघतो. अखेरीस तो त्याची प्रेयसी पारोच्या घरासमोरच मरतो.

ब्लॅक

देवदास चित्रपटाच्या यशानंतर तीन वर्षांनी संजय लीला भन्साळी यांनी ब्लॅक हा चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या कथानकानं प्रेक्षक प्रभावित होऊन गेले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात राणी मुखर्जीनं ४२ वर्षीय अँग्लो-इंडियन असलेल्याअंध, बहिरी आणि मूक महिलेची उत्कृष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभनं मद्यपी शिक्षकाची भूमिका साकारली होती. 'ब्लॅक' हा चित्रपट केवळ संजय लीला भन्साळींच्याच नव्हे तर अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

गुजारिश

'गुजारिश' हा संजय लीला भन्साळींच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. हृतिक रोशनचा दर्जेदार अभिनय पहायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहावा. 'गुजारिश' चित्रपटाची कथा संजय लीला भन्साळी यांनीच लिहिली होती आणि याचं दिग्दर्शनही केलं होतं. या चित्रपटात हृतिक रोशननं गंभीर आजारामुळे व्हीलचेअरवर जीवन जगत असलेल्या एका पूर्वाश्रमीच्या जादूगाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ऐश्वर्या रायनं सोफिया डिसूझा या १२ वर्षांपासून हृतिकची काळजी घेणाऱ्या नर्सची भूमिका साकारली होती.

बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी या चित्रपटासह संजय लीला भन्साळी यांनी ऐतिहासिक काळातील नाट्य चित्रपटांच्या विश्वात पहिलं पाऊल टाकलं. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा झळकले होते. या चित्रपटात रणवीर मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव, प्रियांका चोप्रा त्यांची पत्नी काशीबाई आणि दीपिका त्यांची दुसरी पत्नी मस्तानीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. संजय लीला भन्साळी यांच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे.

संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट - संजय लीला भन्साळी यांनी २०२२ मध्ये आलिया भट्ट हिच्याबरोबर गंगूबाई काठियावाडी हा हिटचित्रपट बनवला होता. भन्साळी यांनी हिरामंडी ही पहिली वेब सिरीज दिग्दर्शित केली होती. या चित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आता संजय लीला भन्साळी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांना घेऊन 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाची कथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.