ETV Bharat / state

"माझ्यावर रेड टाकली असती तर..."; आमदार रामराजेंचा विरोधकांना उपरोधिक टोला - MLA RAMRAJE NAIK NIMBALKAR

आपल्या चुलत बंधुंवरील इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर आमदार रामराजे नाईक-निंबाळकर आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Ramraje and Ranjeetsinha Naik Nimbalkar
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 7:07 PM IST

सातारा - रेड कुणी टाकायला लावली का? हे मला माहिती नाही. पण, कुणीतरी टाकायला लावली, असं लोकांना वाटतंय. आपल्या तालुक्यात कुणावरच अशी रेड झाली नव्हती. ती संजीवराजेंवर झाली. माझ्यावरच रेड टाकली असती तर माझा स्टेटस तरी वाढला असता, असा उपरोधिक टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी आपल्या विरोधकांना लगावला.

तेच खरे कार्यकर्ते : फलटण तालुक्यातील आंदरुड गावात कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीत ते बोलत होते. रामराजे पुढं म्हणाले की, "सत्ता नसताना जे कार्यकर्ते टिकतात, तेच खरे कार्यकर्ते असतात. आपल्याकडं सत्ता उपभोगून काही कार्यकर्ते आता तिकडं गेले आहेत. त्यांनी त्यांची दिशा पकडलेली आहे. तुम्ही आता त्यांच नाव न काढता आपली दिशा पकडा."

फलटणमध्ये मी संस्कृती आणली : "फलटण तालुक्याच्या राजकारणात १९९१ पूर्वी सर्वसामान्यांपेक्षा सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती. सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये आणि गावागावात भांडण लावण्याचे प्रकार सुरु होते. नातं विसरुन एकमेकांच्या भावकीतील लग्नाला लोक जात नव्हते. ही परिस्थिती थांबवण्यासाठी आपण राजकारणात आलो. तालुक्यात विकास केला, संस्कृती आणि शांतता आणली," असंही आमदार रामराजेंनी सांगितलं.

खुर्चीत बसून विरोधकांना संपवेन : "आता माझं वय 77 झालंय. मी थकलो तर नाहीच, फक्त वय वाढलंय. जुणी दुखणी त्रास देणारच. पण, डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन, असा इशारा आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी आपल्या विरोधकांना दिला. तसेच तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही तालुक्यात काम करु शकलो. तो विश्वास तुम्ही घालवू नका," असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

...तर तालुक्याचे बारा वाजतील : "लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राज्यातले दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते, असं सांगून रामराजे म्हणाले की, आपल्या तालुक्याचे प्रश्न पेलणारा माणूस तुम्हाला दिसतोय कां? हे जर त्यांना पेलणार नसेल तर तालुक्याचे बारा वाजायला किती वेळ लागणार आहे?" असा सवाल करत रामराजेंनी नाव न घेता माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना टोला लगावला.

हेही वाचा -

  1. "मला हलक्यात घेऊ नका," एकनाथ शिंदेंचं विधान कुणाला उद्देशून? अजित पवार म्हणाले...
  2. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर केलेली टीका रास्त, शरद पवार यांची स्पष्टोक्ती
  3. "नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार"; ठाकरेंची शिवसेना आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.