ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ जाधवच्या सर्वोत्कृष्ट 5 चित्रपटांची यादी, पाहा येथे... - SIDDHARTH JADHAV

सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक जबरदस्त अभिनेता आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या पाच अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पाहूण तुम्ही हसून लोटपोट व्हाल.

Siddharth Jadhav
सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 24, 2025, 5:23 PM IST

मुंबई - सिद्धार्थ जाधवनं मराठी चित्रपटससृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा अभिनय हा अनेकांना पसंत पडतो. त्यानं मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळ नाव निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची सुरुवात डीडी सह्याद्रीच्या 'एक शून्य बाबुराव' या मालिकेतून केली. 2004 मध्ये, त्यानं केदार शिंदे यांच्या 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्याला 'जत्रा' चित्रपटाची ऑफर मिळाली. तसेच 2006मध्ये त्यानं रोहित शेट्टीच्या 'गोलमाल: फन अनलिमिटेड' या चित्रपटातून त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अलीकडेच तो 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर दिसला होता. आज आम्ही तुम्हाला सिद्धार्थ जाधवच्या काही विशेष चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही पाहू शकता.

1 दे धक्का : सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे दिग्दर्शित 'दे धक्का' हा चित्रपट खूप कॉमेडी आणि भावनिक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 10 कोटींची कमाई केली होती. 'दे धक्का' चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेनं कॅमियो केला होता. या चित्रपटात सायली, एक महत्त्वाकांक्षी डान्सर असून तिला मुंबईत एका प्रतिष्ठित नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. तिच्या कुटुंबाला तिनं इतका दूरचा प्रवास करणे, हे योग्य वाटत नाही, मात्र बक्षीस रक्कम मिळविण्यासाठी तिचे कुटुंब तिला पाठविण्यासाठी तयार होता. तिच्या या प्रवासात तिचे कुटुंब देखील तिच्याबरोबर जाते. या चित्रपटामध्ये या कुटुंबाचा रोमांचक प्रवास दाखविण्यात आला आहे. 'दे धक्का' चित्रपटाचा सीक्वेल देखील तयार करण्यात आला आहे. 'दे धक्का 2' हा चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित झाला होता.

2 जत्रा: ह्यलागड रे त्यालागड : 2006मध्ये प्रदर्शित झालेला 'जत्रा: ह्यलागड रे त्यालागड' हा एक विनोदी चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाला अजय आणि अतुल या जोडीनं संगीत दिलं आहे. या चित्रपटामधील 'कोंबडी पळाली' गाणं खूप जास्त लोकप्रिय झालं होतं. या चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके आणि प्रिय बेर्डे यांनी धमाकेदार अभिनय केला आहे.

3 नवरा माझा नवसाचा 2 : 2024मध्ये प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा 2' मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगावकर यांनी केली आहे. हा चित्रपट 2004मध्ये प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा'चं सीक्वेल आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव आणि हेमल इंगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाची निर्मिती सुश्री चित्रा कंपनीनं केली आहे.

4 टाईम प्लीज : समीर संजय विद्वांस दिग्दर्शित 'टाईम प्लीज' हा चित्रपट खूप मजेशीर आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 26 जुलै रोजी 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव व्यतिरिक्त प्रिया बापट, उमेश कामत, सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते यांच्या विशेष भूमिका होत्या. या चित्रपटाची कहाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. 'टाईम प्लीज' चित्रपटात 24 वर्षांची अमृता (प्रिया बापट), एक स्पष्टवक्ता महिला असते, ती हृषी (उमेश कामत) नावाच्या एका प्रौढ पुरूषाशी लग्न करते. यानंतर त्याच्या संसारात अनेक अडचणी त्यांच्या वयामुळे येतात, मात्र तरीही ते त्यांचे नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटामध्ये सिद्धार्थनं मजेशीर भूमिका केली आहे.

5 अफलातून : परितोष पेंटर दिग्दर्शित 'अफलातून' चित्रपट खूप कॉमेडी आहे. या चित्रपटाची निर्मिती राजीव कुमार साहा यांनी केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 21 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 10 कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती. 'अफलातून' चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, सिल्क टिपनीस, विजय पाटकर,राजेंद्र चावला आणि इतर कलाकारांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.