तब्बल 3 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक वंदे मातरम् गायनातून राष्ट्रीय एकात्मतेचा अद्वितीय आविष्कार - STUDENTS SING VANDE MATARAM
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 20, 2024, 10:42 PM IST
पुणे : राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचं प्रतीक असलेलं, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेलं आणि रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेलं 'वंदे मातरम्' हे प्रेरणागीत पुण्यातील तब्बल 3 हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित गायलं. यावेळी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' चा जयघोष घुमला. 3 हजार विद्यार्थ्यांचा एकसंध आवाज आणि त्यातून व्यक्त झालेल्या देशप्रेमानं वातावरण भारावून गेलं. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलंं. यावेळी कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीत गायलं.