रस्त्यावर सिमेंटचा खच, पोलिसांनीच केला रस्ता स्वच्छ - मुंबई पोलीस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतल्या दादर परिसरात प्लाझा सिनेमाच्या समोर सिमेंटच्या एका मिक्सरमधून मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्त्यावर सांडले होते. मिक्सर लिकेज असल्यामुळे हा प्रकार घडला. तिथं उपस्थित असलेल्या वाहतूक नियंत्रक पोलिसांनी वेळीच हे लिकेज बंद केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण रस्त्यावर सिमेंटचा एक थर जमा झाला होता. अग्निशमन दलाला फोन केला असता येण्यास होणारा विलंब लक्षात घेता तिथेच उपस्थित असणाऱ्या वाहतूक नियंत्रक पोलिस आणि हातात वायफर घेऊन हा संपूर्ण रस्ता पूर्ववत केला. प्रत्येकवेळी मुंबई पोलीस दल मुंबईकरांच्या मदतीला धावत मुंबईकरांची ही मदत आज या घटनेतुन पुन्हा एकदा समोर आली. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी..