विवाह सोहळ्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण - Buldana Mayor news
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाण्याचे भारिप वंचितचे नगराध्यक्ष नजमुन्नीसा आणि नगरसेवक मो. सज्जाद यांच्या मुलींच्या लग्न सोहळा रविवारी पार पडला. यात अनेक मान्यवर उपस्थित होते. औरंगाबादचे खा. इम्तियाज जलीलआणि मुलगा बिलाल यांची देखील उपस्थितीत कार्यक्रमाला होती. त्यावेळी मो सज्जाद यांनी त्यांच्यावर पैशांची उधळण केल्याचे दिसून आलं. नजमुन्नीसा या वंचित बहुजन आघाडीच्या भारिप वंचित पाठिंब्याने नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या, तर त्याचे पती मो.सज्जाद हे विधानसभेसाठी एमआयएम पक्षावरून निवडणुकीत उभे होते.