Sangli Flood : पूरस्थितीबाबत काय म्हणाले सांगलीचे महापौर? - सांगली महापौर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - कृष्णा नदीला आलेल्या पुराने जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक शहर व्यापून टाकले आहे. पाण्याची पातळी ही जवळपास 55 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे सांगली शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सांगली शहरातल्या एक लाखाहून अधिक नागरिकांचे आत्तापर्यंत स्थलांतर झालेले आहे. शहरातील विस्तारत असलेल्या पाण्यामुळे आता थांबून असलेले नागरिक भीतीने बाहेर पडत आहेत. एकंदरीतच या सगळ्या परिस्थिती संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आहे.