Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, महाविकास आघाडीचा चक्काजाम, गडकरींचे आश्वासन - मंत्री उदय सामंत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 27, 2022, 3:31 PM IST

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गाचे काम रखडल्याने ( Mumbai Goa Highway Quadrangle Work Stalled ) महाविकास आघाडीच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात ( Mahavikas Aghadi Protest In Ratnagiri ) आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. चिपळूणमध्ये करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण ( Ex MLA Sadanand Chavan ), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम ( MLA Shekhar Nikam ), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, बाळा कदम आदी सहभागी झाले होते. नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) हे केंद्रातील अधिकाऱ्यांसह दाखल झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari ) यांनी दिलेलं आश्वासनाचं पत्र अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मुंबई - गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडलं आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रश्नी काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवण्यासाठी आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीने चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे चक्काजाम आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.