New Year 2022 : नविन वर्ष मिश्रीत फलदायी देणारे ठरेल - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे - New Year 2022 Nashik news
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - कोरोनामुळे 2020 आणि 2021 हे वर्ष सर्वांसाठी कठीण काळ ठरले. आता 2022 हे वर्ष नागरिकांना मिश्रीत फलदायी देणारे ठरणारे आहे. कृषीसाठी लाभदायी ठरणारे हे वर्ष असून,सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात मात्र परिवर्तन आणि मोठ्या घडामोडी घडण्याचे योग आहेत, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले. तसेच 2022 मध्ये राष्ट्राला अनेक आपत्ती आणि संकटांना सामोरे जावे लागणार आहे. रोगाराईचा प्रादुर्भाव हा मार्च 2022 ते जुलै 2022 पर्यंत अधिक प्रमाणात संभवतो. तसेच शिक्षणासाठी या वर्षी विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दर्शवते. महागाईमध्येही यावर्षात वाढ होईल. तर घर, जमिनी यांचे भाव वधारतील, असे मतही महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी ईटीव्ही भारताशी बोलतांना व्यक्त केलं. ( Mahant Aniket Shastri Deshpande on New Year 2022 )