'करूळ घाट' 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होणार! नितेश राणे यांनी यांची माहिती - NITESH RANE ON KARUL GHAT
🎬 Watch Now: Feature Video
Published : 14 hours ago
मुंबई : तळकोकण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील वाहतुकीचा अत्यंत महत्वाचा दुवा असलेला 'करूळ घाट' हा लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. 'करूळ घाट' येथील वाहतूक मागील वर्षभर बंद होती. तर आता करूळ घाट (Karul Ghat) 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी आज करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. घाटाचं 50 ते 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. 10 जानेवारी रोजी पुन्हा या घाटाची पाहणी करून 15 जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असं यावेळी राणे यांनी सांगितलं. यापूर्वी मुसळधार पावसामुळं करूळ घाटावरील रस्ता अधिकच खचला होता. त्यामुळं हा रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.