नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठा झटका बसलाय. मतदानाच्या पाच दिवस आधी पक्षाच्या सात आमदारांनी राजीनामे दिले आहेत. पक्षानं आमदारांची तिकिटं कापल्यानं त्यांच्यात नाराजी होती. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट नाकारण्यात आल्यानं नाराज होऊन 'आप'च्या सात विद्यमान आमदारांनी राजीनामा दिला.
Aam Aadmi Party MLA from Bijwasan Bhupinder Singh Joon and MLA from Adarsh Nagar Pawan Kumar Sharma resigned from the party
— ANI (@ANI) January 31, 2025
The party did not give tickets to them this time. #DelhiElection2025 https://t.co/uwLTDWZPDB pic.twitter.com/UeEKV5P1B9
- भावना गौर- पालम
- बीएस जून - बिजवासन
- पवन शर्मा - आदर्श नगर
- मदनलाल - कस्तुरबा नगर
- राजेश ऋषी - जनकपुरी
- रोहित मेहरौलिया - त्रिलोकपुरी
- नरेश यादव - मेहरौली
अरविंद केजरीवालांना लिहिलं पत्र : 'आप'च्या या सात विद्यमान आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दोन पानी पत्र लिहिलं असून, राजीनामा देण्याचं कारणही त्यात सांगितलं. नरेश यादव यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "भारतीय राजकारणातून भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरोधातील अण्णांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र, आता आम आदमी पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलाय. प्रामाणिकपणाच्या राजकारणासाठी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पण, आज प्रामाणिकपणा कुठेच दिसत नाही."
Aam Aadmi Party MLA from Mehrauli, Naresh Yadav resigned from the party
— ANI (@ANI) January 31, 2025
Naresh Yadav, who was an MLA for two consecutive terms, was made the candidate of the Aam Aadmi Party for the third time. But after the allegations in the sacrilege case were proved, Naresh Yadav himself… https://t.co/utUxvGfLb9 pic.twitter.com/PL1gq3JVIj
पक्ष आता भ्रष्टाचारात अडकला : मेहरौली विधानसभेतील आपल्या शेवटच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा संदर्भ देत नरेश यादव यांनी लिहिलं आहे की, "100 टक्के प्रामाणिकपणे काम केलं. प्रामाणिकपणे काम केलं हे मेहरौलीतील जनतेला माहिती आहे. मात्र, पक्ष आता भ्रष्टाचारात अडकलाय, त्यामुळं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला."
नरेश यादव यांचं कापलं होतं तिकीट : आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना नरेश यादव यांना उमेदवारी दिली होती, मात्र नंतर त्यांचं तिकीट रद्द करण्यात आलं आणि त्यांच्या जागी महेंद्र चौधरी यांना मेहरौली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
हेही वाचा - "राष्ट्रपती अजिबात थकल्या नव्हत्या"; काँग्रेस नेत्यांच्या विधानानंतर राष्ट्रपती भवननं दिलं स्पष्टीकरण