ETV Bharat / state

पुणे पोलीस दलातील पीएसआयची लोणावळ्यात आत्महत्या; कारण अस्पष्ट - PUNE PSI SUICIDE

पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समजताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

PUNE PSI SUICIDE
पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2025, 10:28 PM IST

पुणे : शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या पुण्यातील खडकी इथल्या पोलीस निरीक्षकानं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. ही माहिती समजताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मावळ भागातील लोणावळा इथं पुणे पोलीस आयुक्तलयातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केली. गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे अधिकारी होते. तीन दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.

आत्महत्येच कारण अस्पष्ट : लोणावळा शासकीय रुग्णालयात गुंजाळ यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी त्यांची गाडी आढळून आली. या गाडीमध्ये एक डायरी आढळून आली आहे. तर, आत्महत्येचं नेमक कारण काय? हे अस्पष्ट आहे. सध्या घटनास्थळी खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे आणि पथक दाखल झालं असून पुढील तपास करत आहेत.

डायरित नेमकं काय? : घटनास्थळी तपास करताना पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांची गाडी आढळून आली. या गाडीमध्ये त्यांना एक डायरी आढळली. त्यामुळं तपास डायरीवर येऊन थांबला आहे. गुंजाळ यांच्या आत्महत्येच कारण डायरीत असेल अशी चर्चा सुरू आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उपनिरीक्षक गुंजाळ यांनी डायरीत काही लिहून ठेवलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. कॉपी कराल तर खबरदार! दहावी, बारावीच्या परिक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी शिक्षण मंडळानं घेतला मोठा निर्णय
  2. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर सर्वच यंत्रणा ऍक्शन मोडवर, 100 पोलिसांचा फौजफाटा
  3. दलालाची 'कलाकारी'; बनावट जीआरद्वारे कला शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देणारा एसीबीच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.