पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे. शहरात या आजाराचे १७० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर, सहा संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात वाढत असलेल्या रुग्णांच्या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "पुणे शहरात वाढत असलेल्या रुग्णांच्या संदर्भात जबाबदारी कोणावर निश्चित करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुण्यात झालेली घटना अनेक ठिकाणी घडू शकते. यामुळं भविष्यात आजारावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे, आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर शासन निश्चित कारवाई करणार आहे." उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधान भवन इथं विविध बैठकींच आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे देखील बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
प्रशासनाच्या वतीनं आजारावर नियंत्रण मिळवण्याच काम : शहरात वाढत्या जीबीएस रूग्णांच्या संदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रशासनच्या वतीनं जीबीएसवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवण्याचं काम केलं जातं आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पेशंटच्या संख्येवर नियंत्रण मिळवलं जात आहे. राज्यात या आधी देखील जीबीएसचं रुग्ण आढळून येत होते. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून जे रुग्ण वाढत होते, त्यावर आता प्रशासनानं नियंत्रण मिळवल आहे. आता रूग्ण संख्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे."
नागरिकांना घाबरू नये : राज्य तसेच केंद्र शासनाच्या अहवालाच्या संदर्भात आरोग्य मंत्री यांना विचारलं असता ते म्हणाले की, विविध संस्थांना याबाबत काम देण्यात आलं आहे. तसंच खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या हॉटल्समधील सांडपाणी आणि पोल्ट्री यांचं देखील सँपल घेतलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं देखील एक टीम आली होती. त्यांनी देखील सॅम्पल घेतलं असून अहवाल लवकरच येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही पद्धतीनं घाबरून जाऊ नये राज्य शासनाच्या वतीनं योग्य ते नियोजन करण्यात येत आहे."
हेही वाचा :