साईबाबांच्या चरणी सोने चांदीचा मुकुट अर्पण - SHIRDI GOLD CROWN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 27, 2024, 9:12 PM IST
शिर्डी : नाताळच्या निमित्ताने शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून भाविक साई चरणी भरभरून दान देताना दिसतायत. इंदूर येथील भाविकाकडून 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण तर तेलंगणा राज्यातील भाविकाने अर्धा किलो चांदीचा मुकुट आज साईचरणी अर्पण केलाय. आज मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथील जुगल जैस्वाल या साईभक्त परिवारानं तब्बल 200 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट (SHIRDI GOLD CROWN) साई संस्थानला भेट स्वोरूपात दिला. याची किमत 14 लाख 20 हजार रुपये असल्याचं भाविकानं सांगितलं. आज साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला रत्नजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला. जैस्वाल इंदूर येथे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. गेल्या 10 वर्षापासून साईबाबांच्या दर्शनासाठी ते येतात. साईंनी आमची प्रत्येक इच्छा पूर्ण केलीय. माझ्या व्यवसायाला साईबाबांनी भरभरून चालना दिली असल्याने आज सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असून साईंच्या चरणी हा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय, असं ते म्हणाले. हैदराबाद येथील खम्मम जिल्ह्यातील शिवासाई या साई भक्त परिवारानं आज शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल. यावेळी साईबाबांना अर्धा किलो वजन असलेला तब्बल 32,200 रुपय किंमत असलेला चांदीचा मुकुट (silver crown) साई चरणी अर्पण केला.