"वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंनी राजीनामा द्यावा", आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टचं सांगितलं - BEED MUK MORCHA
🎬 Watch Now: Feature Video
Published : 15 hours ago
बीड- संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लाखोच्या संख्येनं समुदाय येणार असल्याचं बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं आहे. क्रूरपणे झालेली हत्या समाजासाठी चांगली नसून ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे आज हा मोर्चा निघत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफीयांचा नंगानाच पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड फरार आहे. यावर आमदार क्षीरसागर म्हणाले, "वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. धनंजय मुंडेंचे ते निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये आणि लोकांमध्ये नाराजी आहे. फास्ट्र ट्रॅक कोर्टमध्ये तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तपास झाल्यानंतर त्यांनी हवेतर आणखी मोठे पद घ्यावे". "यापूर्वी सुपाऱ्या देऊन पुरावे नष्ट केल्याचं लोक बोलतात," असा दावाही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी केला.