ETV Bharat / spiritual

सिंह राशीला व्यवसायात मिळेल लाभ, तर वृषभ, धनू राशीला होणार अचानक धनलाभ; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 08 FEBRUARY 2025

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 2:48 AM IST

मेष (ARIES): वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळं कोणाशी संघर्ष होणार नाही आणि त्यामुळं आपण आणि समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक आणि कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता राहिल. त्यामुळं उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल.

वृषभ (TAURUS): वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक आणि मानसिकदृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील आणि त्यामुळं आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळं इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्यानं अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

मिथुन (GEMINI) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क (CANCER) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजची सकाळ कौटुंबिक, व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळं काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणानं मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. हाती असलेली कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. खर्चात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

सिंह (LEO) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या दशम भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र आणि कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळं लाभ होतील. मुलांनकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या (VIRGO) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी, व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचं आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान-सन्मान होतील.

तूळ (LIBRA) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.

वृश्चिक (SCORPIO) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय, मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळं आपणास मदत होईल.

धनू (SAGITTARIUS) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या असेल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील.

मकर (CAPRICORN) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या असेल. आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. स्त्रियांना माहेरकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

कुंभ (AQUARIUS) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या असेल. आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल.

मीन (PISCES) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या असेल. आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद आणि उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडं जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठं यश लाभेल.

हेही वाचा -

करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ 12 राशींसाठी कशी असेल?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.