त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ भिवंडीत बंद; नागरिकांचा समिश्र प्रतिसाद - त्रिपुरा हिंसाचार प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे (thane) - त्रिपुरा राज्यामध्ये विरोधी संघटनेद्वारे मुस्लीम धर्माविरोधात घोषणा देत हिंसाचार (Tripura violence) सुरु आहे. शिवाय त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ भिवंडी शहरातील बाजारपेठासह इतर व्यवसाय बंद (Bhiwandi closed) ठेवण्यात आले होते. मुस्लीम समाजातील वस्त्यांमध्ये निषेध करून या घटनेच्या निषेधार्थ भिवंडी बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये एमआयएम, कॉग्रेस. राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने पाठींबा दर्शविल्याने भिवंडी बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. दरम्यान शहराची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिवंडी शहरातील चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत बंदच्या वेळी शहरात शांतता दिसून आली.