'या' भागात जन्माला आलो, ते पाप केलं का?'; ४५ हजार मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार
🎬 Watch Now: Feature Video
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही या भागातील नागरिक सर्व सोईसुविधांपासून वंचित आहेत. 'या बंदी भागात जन्माला आलो, ते पाप केलं का?' असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदार संघातील ३५ गावातील ४५ हजार मतदारांनी येत्या १८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे.