Vicky Katrina wedding: जयपूर आणि मुंबई विमानतळावर वऱ्हाडींची लगबग - विकी कौशल आणि कॅटरिना कैफ विवाह
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असल्याने मुंबई आणि जयपूर विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथील शाही लग्नाला उपस्थित राहणार असलेल्या सेलिब्रिटींची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दृष्य पाहायला मिळाले. कॅटरिनाचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता कबीर खान त्याची पत्नी मिनी माथूर आणि मुलगी सायरासोबत मुंबईहून रावाना झाला. आज नेहा धुपिया आणि अंगद बेदी देखील मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. नेहा आणि अंगद निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विमानतळावर पोहोचले. कॅटरिना आणि विकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जयपूरला जाणार्या ए-लिस्टर्समध्ये हे जोडपे देखील आहे.विकी आणि कॅटरिना कुटुंबीय आणि मित्रांसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. हे जोडपे ९ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विकी आणि कॅटरिना १२ डिसेंबरपर्यंत बरवारा किल्ल्यावर राहणार आहेत.