Youth Against Navneet Rana खासदार नवनीत राणाविरोधात कारवाई करा, त्या युवकाचे कुटुंब धडकले राजापेठ पोलीस ठाण्यात - उच्च न्यायालय
🎬 Watch Now: Feature Video
Love Jihad Case अमरावती लव्ह जिहादचे Love Jihad Case नाव देऊन आमच्या मुलाची बदनामी करून, त्याचा छळ करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणासाठी खासदार नवनीत राणा MP Navneet Rana या जबाबदार असून आम्ही खासदार राहणार विरोधात तक्रार देऊन देखील पोलिसांनी या तक्रारीची विशेष दखल घेतली नसल्यामुळे आम्ही आता उच्च न्यायालयात धाव घेणार असा इशारा त्या युवकाच्या कुटुंबाने घेतला आहे. Rajapeth Police Station माझा भाऊ सोहेल खान आणि ती युवती हे कॉलेज फ्रेंड होते. व्हाट्सअपवर पण त्यांच्या मैत्रीचा ग्रुप होता. मात्र ती मुलगी घरून निघून गेली, त्याचा माझा भाऊ सोहेल खानशी कुठलाही संबंध नसताना त्याला केवळ खासदार नवनीत राणा यांच्या दबावामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकारामुळे आमचे कुटुंब हादरले असून समाजात आमची बदनामी झाली आहे. लव्ह जिहाद सारखा कुठलाही विषय नसताना माझ्या भावावर खोटे आरोप करण्यात आले, यामुळे पोलिसांनी आमच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात High Court याचिका दाखल करणार, असे सोहेल खानचा भाऊ इमरान शहा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST