Video : नांदेड शहरातील श्रावस्तीनगर भागात साचले पाणी, हजारांहून अधिक नागरिकांची सुटका - Nanded City Rain Water Accumulated

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 17, 2022, 1:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

नांदेड : नांदेड जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसखळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे नांदेड शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी ( Raining Heavily in Nanded ) साचले होते. चार दिवसांपूर्वी श्रावस्तीनगर भागात पाणी साचले ( Water Accumulated in Many Low Lying Areas ) होते. श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरानगर या भागात कमरेइतके पाणी साचले आहे. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसानदेखील झाले आहे. सध्या या भागात 1000 पेक्षा अधिक नागरिक अडकून पडले होते. नांदेड महापालिकेचे ( Nanded Municipal Corporation ) बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू होते. पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्याचे व्यवस्थापन न केल्याने श्रावस्ती भागात अशा प्रकारे पाणी शिरलं होते. माणसांच्या कमरेपर्यंत पाणी आल्यानं त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना बाहेर काढलं जात होते. नांदेडमध्ये आज सलग पाचव्या दिवशीदेखील सूर्यदर्शन झाले नसून पावसाची संततधार सुरूच होती. अर्धापुर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला ( Ardhapur Taluka have Lost Connectivity ) असून शेकडो हेक्टर जमिनीसह रस्ते पाण्याखाली गेले आहे. विष्णुपुरी बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरीसह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.