Karnataka Elections Results : कर्नाटक निवडणूक निकालावर मोठी भविष्यवाणी, वाचा कोण करणार सरकार स्थापन - Predictive about Karnataka elections
🎬 Watch Now: Feature Video
टिहरी (उत्तराखंड): कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या दि. १३ मे रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी, यावेळी कर्नाटकचा कारभारी कोण होणार, अशी चर्चा सुरू आहे. कोण असा नेता असेल ज्याला कर्नाटकात राज्य करण्याची संधी मिळेल? पक्षांबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कर्नाटकचे राजकीय गणित सर्वांना जाणून घ्यायचे आहे. यासाठी अनेक प्रकारचे एक्झिट पोलही समोर आले आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे आकडे समोर आले आहेत. उत्तराखंडच्या ज्योतिषाचार्यंनी कर्नाटक निवडणुकीबाबतही भाकीत केले आहे. टिहरी जिल्ह्यातील चंबा ब्लॉकमधील सावली गावचे रहिवासी असलेले प्रसिद्ध ज्योतिषाचार्य उमाधर बहुगुणा हे नेहमीच निवडणुकीच्यावेळी अंदाज बांधत असतात. त्याचा अंदाजही खरा ठरत आला आहे. कर्नाटकात काँग्रेसला 70 ते 80 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे भाकित प्रसिद्ध ज्योतिषी उमाधर बहुगुणा यांनी केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कुंडलीच्या आधारे काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सिद्धरामय्या यांनी प्रत्येकाच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केल्यावर या सर्व काँग्रेसी लोकांच्या कुंडलीत ग्रहांमध्ये विशेष काही नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे त्यांच्या सत्तेवर येण्याबाबत साशंकता आहे. जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांचे ग्रहही फारसे चांगले नाहीत. त्यांच्या कुंडलीतील ग्रहांचा अभ्यास केल्यावर त्यांना जवळपास 20 किंवा 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या कुंडलीच्या अभ्यासात यावेळी त्यांच्या नशिबात बृहस्पति आल्याचे दिसून आले आहे. बृहस्पति नेहमी त्यांच्याबरोबर असतो, जो धर्माशी संबंधित असतो. त्यामुळे धर्माशी संबंधित पक्षाला येथे बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपचे स्टार चांगलेच चमकत आहेत. पीएम मोदींचे ग्रहही चांगले आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बसवराज बोम्मई यांचे ग्रहही कर्नाटकात चांगले आहेत. याचा विचार करता भाजपला 113 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता बहुगुणा यांनी व्यक्त केली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा आकडा 130 पर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्या मते कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करेल. यापूर्वी ज्योतिषी उमाधर बहुगुणा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी केली होती. ती 100 टक्के खरी ठरली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी कर्नाटक आणि भाजपबाबत भाकीत वर्तवले आहे. आता याची प्रचिती उद्याच्या निकालात येते काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीपूर्वी 'या' नेत्यांनी केली होती बंडखोरी, उद्या होईल फैसला
- Karnataka CM on government formation : कर्नाटकात भाजपचेच सरकार येणार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना विश्वास
- Election Commission Decision In Question : निवडणूक आयोग निर्णय बदलणार का? उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळण्याची शक्यता