अकोला- शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या सत्काराचा खरा मर्म जर काढला तर तुमच्या हे लक्षात येईल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा सरस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा होता. त्यामुळे आदित्य ठाकरे हे घाईघाईत राहुल गांधींना भेटायला गेले आहेत. आता ते शरद पवारांना भेटणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
महाविकास आघाडी ही सध्या अकार्यक्षम नेत्यांची चौकडी : भाजपाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमासंदर्भात आयोजित सभेसाठी ते अकोल्यात आज आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यासोबतच शरद पवारांना आता ते भेटणार नसल्याचाही निष्कर्षही काढलाय. महाविकास आघाडी ही सध्या अकार्यक्षम नेत्यांची चौकडी बनलीय. ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाहीत, ते मशीनवर ठपके ठेवत असल्याचा आरोप ही त्यांनी केलाय.
वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील : राज्यामध्ये वाढलेल्या वाळू माफियांच्या विरोधामध्ये सरकारचे नवे धोरण येणार आहे. वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाळू माफियांवर मोक्का लावणे, हद्दपार करणे यांसारख्या कारवाया करण्यात येणार आहेत. वाळू माफियांवर तर कारवाई होईलच, मात्र रेतीच मिळाली नाहीतर वाळू माफिया तयार होऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता मुबलक प्रमाणात रेती मिळेल आणि लवकरच नवं चांगलं वाळू धोरण जाहीर करू, तर यात कडक कायदे आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितलंय.
महायुतीत कुठलीही नाराजी नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते, याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महायुतीत कुठलीही नाराजी नाही, उलट मीडियाच नाराजी असल्याच्या बातम्या दाखवत आहे. आमची महायुती मोठ्या प्रमाणात मजबूत आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत कुठेही ठिणगी पडणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -