ETV Bharat / state

रेल्वे स्थानकातून बालकाचं अपहरण ; पोलिसांनी केली बालकाची सुखरूप सुटका, नराधमांना ठोकल्या बेड्या - ARRESTED CHILD KIDNAPPED

रेल्वे ब्रिजखालून बालकाचं अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. या नराधमांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

Arrested Child Kidnapped
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2025, 10:25 PM IST

ठाणे : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील गोरेगाव रेल्वे स्थनाकातून 5 वर्षीय बालकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. मात्र उल्हासनगर पोलिसांनी जलद गतीनं तपासाची चक्रं फिरवत अपहरकर्त्यांना अटक केली. विशेष म्हणजे त्यांच्या तावडीतून अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका करून दोन्ही अपहरकर्त्यांना बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे. करण रामथिरण कनोजीया (रा. गोरेगाव मुबई) धरमपाल रामकिशोर यादव, रा. खोपोली रायगड, ) असं अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावं आहेत.

ब्रिजखाली राहणाऱ्या मजुराच्या बालकाचं अपहरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुबंई गोरेगाव भागातील एका ब्रिजखाली कुटूंबासह राहून मजुरीचं काम करतात. तर आरोपी करण हाही याच ठिकाणी राहत असल्यानं दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा घेऊन पाच वर्षीय बालकाचं 11 फ्रेब्रुवारी गोरेगाव रेल्वे स्थनाकातून अपहरण झाल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी अपहरणकर्त्यांची नावं निष्पन्न करून अपहरण झालेल्या बालकाचा शोध सुरू केला.

बालकाला घेऊन काढली कल्याण रेल्वे स्थानकात रात्र : विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी बालकासह एक रात्र कल्याण रेल्वे स्थानकात घालवली असल्याचं आरोपीच्या तपासात समोर आलं. त्यानंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी अपहरणकर्त्याची कसून तपासणी केली असता, उल्हासनगर शहाड रेल्वे फाटक शिवाजी रोड मार्केट, परिसरात असल्याचं उघड झालं. रेल्वे पोलिसांनी तातडीनं उल्हासनगर पोलिसांशी संपर्क साधून अपहरणकर्त्यांची माहिती पाठवली. त्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मित्राच्या मुलाचं अपहरण : विशेष म्हणजे अपहरणकर्ते हे उल्हासनगर शहाड भागात राहणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराकडं आल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मित्रानंच मित्राच्या मुलाचं अपहरण केल्याचं उघडकीस आलं आहे. तर दुसरीकडं 12 फेब्रुवारीला रात्री उशिरा दोन्ही आरोपीला बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना अटक केली आहे. तर बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे. आता बालकाचं नेमकं अपहरण कशामुळं करण्यात आलं, याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

  1. भाजपा आमदाराच्या मामाची हत्या; गुन्हे शाखेनं दोन संशयितांना ठोकल्या बेड्या, खुनाचा होणार उलगडा ?
  2. "एका तरुणाचे 9 कोटी रुपयांसाठी अपहरण", नाना पटोलेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, आता चव्हाण म्हणतात...
  3. मुलं पळवणारी सांगलीची टोळी पालघरमध्ये जेरबंद; दोन पुरुषांसह चार महिलांना ठोकल्या बेड्या - Child Kidnapping Gang

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.