Prakash Ambedkar : महिलेची धिंड काढणाऱ्या भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा - प्रकाश आंबेडकर - woman penis in bead
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/22-10-2023/640-480-19832932-thumbnail-16x9-prakash-ambedkar.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 22, 2023, 8:41 PM IST
मुंबई : Prakash Ambedkar : बीडमधील महिलेची धिंड काढणाऱ्या भाजपाच्या नेत्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. बीड जिल्ह्यात भाजपाच्या नेत्यानं एका महिलेची धिंड काढली. तसंच धिंड काढताना सदर घटनेचा व्हिडिओ देखील काढला. कारण ती महिला तिची जमीन विकायला तयार नव्हती. म्हणुन भाजपाच्या गावगुंडानं तिचा नग्न अवस्थेत व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकला असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावगुंडांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल करतील असं वाटतं नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून मुली गायब होण्याचे प्रमाण वाढलं आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -