Ravi Rana Sundarkand : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रवी राणांचे सुंदरकांड!, नवनीत राणा म्हणाल्या.. - रवी राणा सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : एकीकडे अजित पवार यांच्या शपथविधीने राज्यात राजकीय भूकंप आला असताना आता बडनेराचे आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण केले. रवी राणा यांनी अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. आता येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अजित पवार हे भाजप सोबत येणार असे भाकीत केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर ते पुन्हा भाजपपासून दूर झाले होते. राणा दाम्पत्याने मात्र वारंवार अजित पवार हे भाजप सोबत येतीलच असे भाकीत केले होते.