Video : महाआरती वसंत मोरे यांची, पण चर्चा मुस्लिम कार्यकर्त्याची - महाआरती
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15220673-thumbnail-3x2-more.jpg)
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर भोंग्याबाबत घेतलेल्या आंदोलनात मोरे यांची गैरहजेरी होती. पण आज त्यांनी त्यांच्या प्रभागात महाआरतीचे आयोजन केलेले आहे. आज महाआरती होत असली तरी जास्त चर्चा होत आहे हनुमानाची मूर्ती रंगवणाऱ्या रियाझ शेख या कार्यकर्त्याची...
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST