Chandrakant Patil Reaction on Eknath Shinde : प्रस्ताव आला तर विचार करू - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील - आघाडी सरकार
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापल आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देणारी विधाने भाजपमधून केली जात आहे. एकनाथ शिंदे यांचा युतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेच्या अंतर्गत कलहाचा प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा काहीच संबंध नाही. शिवसेना त्यांचा प्रश्न सोडवेल. मात्र, यामागे भाजप नक्कीच नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST