Ludhiana Gas Leak: गॅस गळतीनंतर नेमके काय घडले? स्थानिकांनी दिल्या 'या' प्रतिक्रिया - गॅस गळती
🎬 Watch Now: Feature Video
लुधियाना : जिल्ह्यातील ग्यासपुरा भागात वेरका बूथमध्ये गॅस गळतीमुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील एका कारखान्यातून आज पहाटे गॅस गळती झाल्याने अनेकजण त्यात अडकले. ग्यासपुरा येथील सुवा रोडवर असलेल्या कारखान्यात गॅस गळती झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे 300 मीटरच्या परिघात जाणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री भगवंत इसिंग मान यांनी ट्विट केले. ट्विट करून अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले, तसेच संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातग्रस्तांना मदत दिली जात आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा भागातील कारखान्यात गॅस गळतीची घटना अत्यंत दुःखद आहे. पोलीस, सरकार आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी हजर आहेत. शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आता हा परिसर सील करण्यात आला आहे. कोणालाही घटनास्थळी जाण्याची परवानगी नाही. लोकांना अंतर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांची जगण्याची शक्यता फार कमी आहे. कमर्शिअल एरिया असल्यामुळे तेथे चार ते पाच कुटूंबे राहत होती. एकूण 20 ते 25 जण या गॅस गळतीत सापडले आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. गॅस गळतीबाबत काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकारने याबाबत कसून चौकशी करावी, व भरपाई द्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.