हैदराबाद : चीनी टेक दिग्गज Xiaomi या महिन्यात त्यांचा Xiaomi 15 Ultra स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळं तो कंपनीच्या नवीनतम फ्लॅगशिप मालिकेतील सर्वात प्रीमियम डिव्हाइस बनेल. ऑक्टोबर 2024 मध्ये चीनमध्ये Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro च्या पदार्पणानंतर, आगामी अल्ट्रा मॉडेलमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, विशेषतः कॅमेऱ्यात कंपनी मोठा बदल करू शकते.
Xiaomi 15 Ultra
अलीकडील लिक अहवालात, Xiaomi 15 Ultra 26 फेब्रुवारी रोजी लॉंच होण्याची शक्यता आहे. GSMArena नं लिकची महिती दिलीय. लिकनुसार शेअर केलेल्या प्रमोशनल पोस्टरमध्ये या संभाव्य लाँचच्या तारखेची माहिती आहे. शिवाय, स्मार्टफोनसाठी आधीच चीनमध्ये बुकिंग सुरू झालं आहे. हा फोन मार्च 2025 मध्ये जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत लॉंच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, शाओमीनं मार्चमध्ये 14 अल्ट्रा स्मार्टफोन सादर केला होता.
5000 एमएएच बॅटरी
शाओमी 15 अल्ट्रात मोठे बदल होईल, अशी अपेक्षा आहे, विशेषतः त्याच्या फोटोग्राफी क्षमतांमध्ये बदल होतील. लीकवरून असं दिसून येते की हँडसेटमध्ये क्वाड-कॅमेरा सिस्टम असेल, ज्याचं 50 एमपी प्राथमिक सेन्सर असेल. हुड अंतर्गत, शाओमी 15 अल्ट्रा नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे, जो शाओमी 15 आणि 15 प्रो मॉडेलमध्ये वापरला जाणारा समान प्रोसेसर आहे. यात 16 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनमध्ये 2 के क्वाड-कर्व्हड डिस्प्ले आणि 90 वॅट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे.
अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर
याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधकतेसाठी संभाव्य IP68 आणि IP69 रेंटींग असेल. Xiaomi नं अद्याप किंमतीच्या तपशीलांची पुष्टी केलेली नसली तरी, Xiaomi 14 Ultra भारतात 99,999 मध्ये 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी लाँच केला गेला आहे. अपेक्षित सुधारणा पाहता, 15 Ultra ला रिलीज झाल्यावर त्याची किंमत थोडी वाढू शकते.
हे वाचलंत का :