हैदराबाद : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा (jee mains 2025 result) मुख्य 2025 सत्र 1 चा निकाल आज संध्याकाळी किंवा उद्या १२ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे. निकाल एकदा जाहीर झाल्यानंतर, परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर त्यांच्या गुणाची तपासणी करु शकतात.
जेईई मेन्स निकाल 2025
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज किंवा 12 फेब्रुवारी रोजी संयुक्त प्रवेश परीक्षा (jee result) मुख्य 2025 च्या सत्र 1 चा निकाल जाहीर करेल. निकाल लागल्यानंतर उमेदवारांना nta च्या jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 10 फेब्रुवारी रोजी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मेन 2025 ची अंतिम उत्तरपत्रिका जारी केली होती. त्यामुळं जेईई मेन 2025 चा निकाल आज कधीही जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) BE आणि BTech पेपर्सचे निकाल (jee main result 2025) तपासता येतील.
जेईई मेनचा निकाल कसा तपासायचा?
NTAनं 22 ते 30जानेवारी दरम्यान जेईई मेन 2025 चं पहिलं सत्र आयोजित केलं होतं. अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, उमेदवार खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांचे निकाल देखील तपासू शकतात. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE मुख्य) 2025 ला बसलेल्या उमेदवारांना निकाल जाहीर होण्यापासून ते डाउनलोड करण्यापर्यंतच्या प्रत्येक नवीन माहितीचे नवीनतम अपडेट्स एनटीएच्या वेबसाईटवर पहायला मिळतील.
- जेईई मेन निकाल २०२५ च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
- होमपेजवरील जेईई निकाल लिंकवर क्लिक करा.
- जेईई मेन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख प्रविष्ट करा
- जेईई निकालात नमूद केलेले सर्व तपशील तपासा
- भविष्यातील संदर्भासाठी जेईई मुख्य निकालाचं स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
हे वाचलंत का :