ETV Bharat / entertainment

'परीक्षा पे चर्चा'मध्ये दीपिका पदुकोणनं विद्यार्थ्यांना दिल्या खास टिप्स, पंतप्रधान मोदींचं मानलं आभार - PARIKSHA PE CHARCHA

'परीक्षा पे चर्चा'च्या आगामी एपिसोडमध्ये, दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य टिप्स देणार आहे. हा भाग उद्या १२ फेब्रुवारी रोजी लाँच होईल.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण आणि नरेंद्र मोदी ((IANS/Teaser Screen Grab))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 7:38 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षापासून नियमितपणे देशातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन आणि जिद्दीनं पुढं जाण्याबद्दलची प्रेरणा देत असतात. त्यांच्या बहुप्रतिक्षित 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या आठव्या भागात त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोमवारी प्रसारित झालेल्या या भागात पंतप्रधानांनी अनेक विषयांवर माहिती दिली. ज्यामध्ये स्मार्ट पोषण टिप्स, परीक्षेचा दबाव व्यावसायिकरित्या हाताळणं आणि चांगलं नेतृत्वगुण यासारखे विषय समाविष्ट होते. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी खास घडणार आहे कारण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटणार आहे.

दीपिकानं विद्यार्थ्यांना दिल्या मानसिक आरोग्याच्या टिप्स - दीपिका पदुकोण 'परीक्षा पे चर्चा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, ती तिच्या शालेय दिवसांबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. यात तिनं अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यातील नैराश्याबद्दलही ती बोलली. दीपिकाने तिचा अनुभव सांगितला आणि मानसिक आरोग्य तुमच्या आयुष्यातील इतर पैलूंवर कसा परिणाम करतं याविषयी सांगितलं.

दीपिकानं पंतप्रधान मोदींचे आभार मानले - दीपिकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या एपिसोडची एक क्लिप शेअर केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या संधीबद्दल आभार मानलं आहेत. तिनं लिहिलंय, "मानसिक आरोग्याबाबतची तुमची कमिटनमेंट पूर्ण केल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे आभार. हा एपिसोड लाँच करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."

Deepika Padukone thanked Prime Minister Modi
दीपिका पदुकोणनं पंतप्रधान मोदींचं मानलं आभार ((Instagram))

'परीक्षा पे चर्चा'च्या या भागाचा टीझर शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "परीक्षा पे चर्चा' त्याच्या ८ व्या सीझनसह परत आला आहे. यावेळी आपण मानसिक आरोग्यावर चर्चा करू. या मुद्द्यावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमिटमेंटबद्दल मी त्यांचं आभार मानते. मी आमचा एपिसोड सुरू करण्यास उत्सुक आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.