ETV Bharat / entertainment

लग्नाच्या 17 व्या वाढदिवशी मान्यता दत्तनं काय केलं, पाहा व्हायरल व्हिडिओ - MAANAYATA DUTT AND SANJAY DUTT

संजय दत्त आणि मान्यता दत्त हे त्याच्या लग्नाचा 17वा वाढदिवस साजरा करत आहेत. आता मान्यतानं पतीसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

Maanayata dutt
मान्यता दत्त (संजय दत्तच्या लग्नाचा 17वा वाढदिवस फोटो - (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 11, 2025, 12:20 PM IST

मुंबई - अभिनेता संजय दत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक अभिनेता आहे, जो त्याच्या चित्रपटांमुळेही नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड इंडस्ट्रीनंतर, संजय दत्त आता साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. त्याचा अभिनय साऊथमधील लोकांना देखील खूप आवडत आहे. 11 फेब्रुवारी रोजी संजय दत्तनं मान्यता दत्तशी लग्न करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. मान्यताबरोबर लग्न केल्यानंतर 'संजू बाबा'चे आयुष्य पूर्णपणे बदलले. आज 'संजू बाबा' आणि मान्यता , बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. आता हे जोडपे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. मान्यता दत्तनं पती संजयला एका अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.आता तिची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट अनेकांना आवडत आहे. संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाले आहेत.

मान्यता दत्तची पोस्ट : मान्यतानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर दुप्पट प्रेम करता!!' जेव्हा आपण पहिल्यांदाच म्हणतो आई लव यू तेव्हा आपण खूप घाई करत असतो. त्यांचे दिसणे, त्यांचे चालणे, त्यांचे बोलणे, यामुळे आपण प्रभावित होतो. पण काही महिन्यांनी किंवा वर्षांनी सर्व पडदा उठतो आणि मग तुम्हाला कळते की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता! आपण त्या व्यक्तीला तसेच राहू देतो, जसे ते आहे. जर त्यांच्यात काही कमतरता असतील तरही आपण त्याच्यावर प्रेम करतो. प्रेम ते आहे जे चांगले आणि वाईट दिवस असूनही तुमच्याबरोबर राहते. समजून घेणे, जाणून घेणे म्हणजे प्रेम. जेव्हा तुम्ही म्हणता की, मी तुझ्यावर प्रेम करते, तेव्हा हे प्रेम ताकद बनते. मी तुझ्यावर कायम प्रेम करते संजय दत्त, माझ्या त्रासदायक पत्नी.'

संजय दत्तचं वर्कफ्रंट : आता मान्यतानं प्रेमाचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केल्यामुळे लोकांना ही पोस्ट आवडत आहे. या पोस्टवरून दोघांमध्ये किती प्रेम आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'बागी 4' या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट रुपेरी पडद्यावर 5 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता अनेकजण 'संजू बाबा'ला नवीन अवतारामध्ये पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.

हेही वाचा :

  1. संजय दत्त स्टारर 'मुन्नाभाई एमबीबीएस'ला 21 वर्षे पूर्ण, वाचा 10 धमाकेदार डायलॉग...
  2. शरद केळकरचा उग्र अवतार असलेला मराठी चित्रपट 'रानटी', संजय दत्तनं शेअर केला टिझर
  3. संजय दत्तच्या 'केडी- द डेव्हिल'चा फर्स्ट लूक लॉन्च, 'धक देवा'चं विंटेज रणांगणात वादळी पाऊल - sanjay dutt first look poster

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.