मुंबई : इंग्लिश हिटमेकर एड शीरन सध्या त्यांच्या 'द मॅथेमॅटिक्स टूर'मुळे चर्चेत आहे. तो भारतात वेगवेगळ्या शहारांमध्ये शो करत आहे. हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर, गायक बंगालमध्ये पोहोचला आहे. त्याच्या सादरीकरणापूर्वी, तो भारतातील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला भेटला. आता या खास भेटीची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शीरननं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अरिजितच्या मूळ गावी जियागंजला भेट दिली. अरिजितनं शीरनला त्याच्या गावी खूप फिरविले. एड शीरन आणि अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरिजित सिंग पुन्हा एकदा स्कूटी चालवताना दिसत आहे.
अरिजीत सिंगनं एड शीरनला दिली स्कूटीची सवारी : व्हिडिओत अरिजीत सिंगबरोबर स्कूटीवर मागच्या सीटवर हा एड शीरन असल्याचा दिसत आहे. अरिजीतनं शीरनला त्याच्या स्कूटरवरून जियागंजला नेलं. याशिवाय अरिजीतबरोबर त्याचे काही मित्र देखील वेगवेगळ्या स्कूटरवरून प्रवास करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एड शीरननं अरिजीतबरोबर सुमारे पाच तास घालवले. हे दोघेही फुलमोरहून भागीरथीच्या काठावर गेले. यानंतर शिबतळा घाटावर ते एका नावेत बसले आणि सुमारे एक तास नदीत फिरले. दोन्ही रॉकस्टार्सच्या या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या कमेंट्स देत आहेत.
Ed Sheeran comes to Arijit Singh's hometown, and Arijit drives him through the streets of Jiaganj pic.twitter.com/K4nqZvout1
— chittaranjan. (@i_CHITTARANJAN1) February 10, 2025
Ed Sheeran comes to Arijit Singh's hometown, and Arijit drives him through the streets of Jiaganj pic.twitter.com/K4nqZvout1
— chittaranjan. (@i_CHITTARANJAN1) February 10, 2025
अरिजीत सिंग आणि एड शीरनचं चाहत्यांनी केलं कौतुक : एका सोशल मीडिया यूजर्सनं या दोन्ही कलाकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता यावर एका यूजरनं लिहिलं, 'आंतरराष्ट्रीय कलाकार रस्त्यावर स्कूटरवरून फिरतो, जगात अरिजीत सिंगसारखा व्यक्ती तुम्हाला कुठे सापडेल'. दुसऱ्या एकानं लिहिलं, 'शीरनच्या साधेपणाचे कौतुक.' आणखी एकानं लिहिलं, 'शोलेमधील जय-वीरू.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर करून या दोन्ही कलाकारांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याआधीही अरिजित सिंग स्कूटर चालवताना दिसला आहे. बंगाल निवडणुकीदरम्यान तो आपल्या पत्नीबरोबर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला होता. तसेच 2024मध्ये एड शीरन हा अरिजीतबरोबर लंडनमधील एका कॉन्सर्टमध्ये सामील झाला होता. दरम्यान 8 फेब्रुवारी रोजी, एडनं बेंगळुरूमध्ये कॉन्सर्ट केला होता. आता तो 12 फेब्रुवारी रोजी त्याच्या कॉन्सर्टसाठी शिलाँगला जाईल. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी तो दिल्लीत कॉन्सर्ट करून भारत दौरा संपवेल.
हेही वाचा :