Ganpati Immersion: मुंबईत दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात, पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 20, 2023, 8:59 PM IST
मुंबई Ganpati Immersion: राज्यात आणि मुंबईत काल गणपती बाप्पाचे मोठे उत्साहात आगमन झाले. अनेक कुटुंबातील परंपरेनुसार दीड दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालं होतं. बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारी दीड दिवस पूर्ण होतो. या दीड दिवसाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास सुरू झाली आहे. आता दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर (One and half day Ganpati Immersion) सज्ज झाले आहेत. बुधवार पार्क कफ परेड परिसरात (Mumbai Cuff Parade Area) गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यासाठी मुंबई महापलिकेच्या वतीने जोरदार तयारी केली जात आहे. (Ganesh Festival 2023) मुंबई कफ परेड परिसरातील शिवशास्त्री नगर, मच्छिमार नगर, बुधवार नगर, रेल्वे वसाहत, तलवार कॅम्प, दांडी आरसी चर्च परिसरातील घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी बुधवार पार्क परिसरात समुद्रात नैसर्गिक पद्धतीने बाप्पा विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच कृत्रिम तलावाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला' अशा प्रकारच्या घोषणासह मुंबईत बुधवार पार्क मध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली.