Satara Fogg Video : विजापूर - गुहागर महामार्गावर धुक्याची चादर, नयनरम्य वातावरण आणि गुलाबी थंडीची चाहूल - winter atmosphere in satara
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16271964-thumbnail-3x2-satara.jpg)
विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्ग शनिवारी पहाटे दाट धुक्यात fog on Bijapur Guhagar National Highway हरवल्याचे आल्हाददायक चित्र पाहायला मिळाले. शेत-शिवारे देखील काही काळ धुक्यात लुप्त झाली होती. पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या महिला, नागरीकांनी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटला. शाळा - कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना दाट धुक्याचा नजारा foggy morning मोबाईल कॅमेर्यात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. नदीपात्रातील पाण्यावरून निघणार्या वाफा आणि सर्वत्र पसरलेली दाट धुक्याची चादर, अशा नयनरम्य वातावरणाने जणू गुलाबी थंडीची चाहूल winter atmosphere in satara लागली. धुक्यामुळे सकाळी पावणे आठपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST