Cold Increase in Maharashtra: राज्यात थंडी वाढणार, अनेक भागात तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता - Cold Increase
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका ( Cold wave in Maharashtra ) तर, कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला ( temperature in the state dropped ) आहे. त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. येत्या 6 तारखेपासून राज्यात थंडी वाढणार ( Cold will increase in Maharashtra ) असून पुण्यासह राज्यातील काही भागांमध्ये पारा हा 10 अंश खाली येणार आहे. तर, येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊसाची शक्यता ( Rain is likely in Maharashtra ) देखील असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST