Video डोळ्यांवर पट्टी बांधून चिमुकल्यांनी केला राजगड किल्ला केला सर

By

Published : Nov 15, 2022, 11:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

thumbnail

पुणे १४ नोव्हेंबर हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिवसाला बाल दिन म्हणून अवघे भारत वर्ष साजरे करत असतो. याच बालदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील दोन बालचमुंनी अनोखा उपक्रम राबविला आहे. राजगड किल्ला डोळ्यांवर पट्टी बांधून सर केला. इतकेच नव्हे तर यावरील बालेकिल्ला अवघ्या 14 मिनिटांत सर केला आहे. नव महाराष्ट्र स्कूल धनकवडीचा विद्यार्थी भावार्थ दीपक शिळीमकर वय १० आणि नकुल सुधीर गरुड वय १० या दोघांनी सदरील मोहीम आखली. ही जोडगोळी प्रत्येक बालदिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम आखत असते. यावर्षीच्या उपक्रमातीला मोहीम राबविण्यासाठी भावार्थ आणि नकुल यांनी प्रशिक्षण घेतले होते. शिवाय त्यांनी तगडी मेहनतही घेतली होती. या मेहनतीच्या बळावरचं त्यांची ही मोहीम फत्ते झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर जाण्याची मोहीम आखल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होते आहे. आपल्या इतिहासातून आपण प्रेरणा, साहस आणि जिद्द शिकावी म्हणून ही मोहीम आखल्याचे भावार्थ आणि नकुल यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.