BRS Meeting in Sambhajinagar : बीआरएसची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी - तेलंगणाचे आमदार जीवन रेड्डी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18331758-thumbnail-16x9-brs-abd.jpg)
छत्रपती संभाजीनगर : बीआरएसची आज छत्रपती संभाजीनरमध्ये सभा आहे. त्यासाठी भव्य स्टेज उभारले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभेचे मैदान बदलण्यात आले आहेत. बीआरएसमध्ये मनसेचे, राष्ट्रवादीचे काही नेते यापूर्वीच सहभागी झाले आहेत. या सभेत काही नगरसेवक बीआरएसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. संपूर्ण शहरात गुलाबी रंगाचे ध्वज लावण्यात आले आहेत. तर शहरात तेलंगणामधील कामांची माहिती देणारे कटआउट देखील लावण्यात आले आहेत. बीआरएसकडून शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी करण्यात आली आहे. बीआरएस मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेलंगणाचे आमदार जीवन रेड्डी म्हणाले, की केसीआर मॉडेल खूप चांगले आहे. एका लाखापेक्षा जास्त लोक सभेला येणार आहेत. ५० नगरसेवक बीआरएसमध्ये येणार आहेत. ही सभा ऐतिहासिक होणार आहे.