Bhupesh Baghel : गरज वाटली तर आम्हीही बजरंग दलावर बंदी घालण्याचा विचार करू -भूपेश बघेल - Bhupesh Baghel commented on Bajrang Dal
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18414646-thumbnail-16x9-bhagel.jpg)
रायपुर (छत्तीसगड) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. आता या मुद्द्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही मोठे वक्तव्य समोर आले आहे. मुख्यमंत्री भूपेश म्हणाले की, जर गरज पडली तर आम्ही छत्तीसगडमध्येही बजरंग दलावर बंदी घालण्याचा विचार करू. सध्या कर्नाटकच्या समस्येनुसार तिथे बंदी घालण्याची चर्चा आहे त्यातच आता बघेल यांनी हे वक्तव्य केल्याने आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे. बजरंग दलाचे लोक बजरंगबलीच्या नावाने गुंडगिरी करत आहेत, जे योग्य नाही, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहेत. छत्तीसगडमध्येही बजरंग दलाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही त्यात सुधारणा केली. बंदी घालायची गरज पडली तर इथेही विचार करू असही ते म्हणाले आहेत.