अंजली दमानिया यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, काय आहे कारण? - छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-11-2023/640-480-20053858-thumbnail-16x9-anjali-damania.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Nov 18, 2023, 4:50 PM IST
मुंबई Anjali Damania : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठी जात असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीय. दरम्यान, छगन भुजबळांचे जालन्यामधील भाषण अत्यंत वादग्रस्त ठरले. यावेळी भुजबळांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांविरोधात अनेक विधानं केली. मी कोणाच्या कष्टाचं खात नाही, तर मी स्वतःच्या कष्टाचंच खातो, असं भुजबळ यांनी म्हटल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत भुजबळांच्या घरासमोर येऊन खुलासा करणार असल्याचं म्हटलं. मात्र तत्पूर्वीच जुहू पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांचे घर असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात केला. तसंच अंजली दमानिया यांना छगन भुजबळांच्या घरासमोर पोहोचण्याअगोदरच ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.