बाबरी प्रकरणात हात वर करणाऱ्यांनी शिवसेनेला तालिबानी म्हणू नये, संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - talibani supporters
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई -शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. हे मोदीपासून फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्यांनी हात वर केले होते, त्यांनी शिवसेने बद्दल बोलू नये. जेव्हा मुबंईत १९९३ ला पाकिस्तानने दंगली उसळल्या तेव्हा देखील शिवसेनेने आपले हिंदुत्व दाखवले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला तालिबानी म्हणून नये. आम्ही राष्ट्रवादी होतो म्हणून आम्ही बाबरीचा कंलक पुसून काढला. त्यामुळे मुंबईत दंगलीत घराला कुलूप लावून बसणाऱ्यांनी आम्हाला तालिबानी म्हणू नये, शिवसेनेने काय आहे आमच्या आत्मल्या जनतेलसा माहित आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला तालिबानी म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला एकीचा सल्ला-
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बैठक झाली. या बैठकीत १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. आता आपण एक आहोत पण जेल्हा खुर्ची दिसेल तेव्हा हे सर्व विरोधक एकजुटीने राहतील असा विश्वास जनतेत निर्माण झाला पाहिजे, तरच या विरोधकांच्या एकीला महत्व असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तालिबान पासून आपल्या देशाला धोका आहे. तालिबानला पाकिस्तान आणि चीनचा पाठिंबा आहे, हे देखील सर्वाना माहित आहे. चीन आणि पाकिस्तानचे शत्रू आहेत, हे माहित असताना भारतातून तालिबानला समर्थन देणारे आवाज उठत असतील तर भारत सरकारने या शत्रू देशांना मदत होईल अशी भाषा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. ही जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचेही राऊत म्हणाले.