हैदराबाद : Realme नं बुधवारी आपला नवीन Realme 14x 5G स्मार्टफोन लाँच केला. भारतात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होणारा हा पहिलाच फोन असून, जो IP69 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येतो.
realme 14x 5G लाँच : Realme नं अखेर आज म्हणजेच बुधवार 18 डिसेंबर रोजी आपला नवीन ५G स्मार्टफोन Realme 14x 5G लाँच केला. कंपनीनं दावा केला आहे की 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होणारा हा भारतातील पहिलाच असा फोन आहे, जो IP69 रेटिंगसह येतो. हे वैशिष्ट्य फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवतं. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये मजबूत कॅमेरा सेटअप, शक्तिशाली बॅटरी आणि उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. चला तर मग त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये सविस्तरपणे जाणून घेऊया.
Realme 14x 5G ची किंमत : Realme 14X 5G हा स्मार्टफोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 6 जीबी + 128 जीबी मॉडेलची किंमत 14,999 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन आता फ्लिपकार्ट, realme.com आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट मिळू शकते. या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर, फोनची सुरुवातीची किंमत 13,999 रुपयांपर्यंत होईल.
realm 14X 5G स्पेसिफिकेशन : 14X 5G स्मार्टफोन अनेक फीचर्ससह लॉंच झाला आहे. रियलमीच्या या नवीन फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. ज्यामध्ये 45 वॉट फास्ट चार्जिंग, 50MP मेगापिक्सेल AI कॅमेरा, 6000 MH बॅटरीसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
HD+ IPS LCD स्क्रीन : या फोनमध्ये 6.67-इंच (720×1604 पिक्सेल) HD+ IPS LCD स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 6nm प्रोसेसरनं सुसज्ज आहे. फोनमध्ये 6GB / 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB (UFS 2.2) स्टोरेज आहे. मायक्रोएसडीच्या मदतीनं स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.
6000mAh बॅटरी : हायब्रिड ड्युअल सिम (नॅनो + नॅनो / मायक्रोएसडी) सह येणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित Realme UI 5.0 OS वर काम करतो. यात 45W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंग तसंच उत्तम बॅटरी लाईफ प्रदान करते.
50MP चा रियर कॅमेरा : कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, realme 14X 5G मध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा रियर कॅमेरा, LED फ्लॅश आणि f/2.0 अपर्चरसह 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं तर, या फोनमध्ये तुम्हाला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, अल्ट्रा-लिनियर बॉटम-पोर्टेड स्पीकर आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 + IP69 रेटिंग मिळतं.
हे वचालंत का :