नागपूर : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर मोठी टीका केली आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपली मतं मांडली पाहिजे. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी सभागृह आहे. मात्र बाहेर नौटंकी करायची अन् सभागृहात गप्प बसायचं, असा विरोधकांचा डाव आहे. त्यामुळे विरोधकांनी जनादेशाचा अपमान करू नये, अन्यथा निवडणूक लढवू नये, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीवरुन हल्लाबोल : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणीही भेटू शकते. मात्र जेव्हा सत्तेत होते, तेव्हा ज्यांना अटक करुन कारागृहात टाकायला निघाले होते, त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट का घ्यावी, त्यांना काहीच वाटत नाही," का असा सवाल त्यांनी यावेळी केला.
अन्यथा विरोधकांनी निवडणुका लढवू नये : विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करुन हे सरकार ईव्हीएम सरकार असल्याचं विरोधकांनी हिणवलं. यावर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस पक्षानं ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करुन न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानं काँग्रेस पक्षाला फटकारलं. तुम्ही जेव्हा जिंकता, तेव्हा तुम्हाला ईव्हीएमवर कोणतीच शंका नसते. मात्र जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा तुम्हाला ईव्हीएमवर शंका येते, असं न्यायालयानं स्पष्ट केलं," असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. विरोधकांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणं सोडून द्यावं, त्यांनी जनादेशाचा अपमान करू नये. विरोधकांनी आपल्या चुका शोधण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :