मुंबई/नागपूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
"भाजपा पक्ष आणि उर्मट नेते महापुरुषांचा अपमान करत आहेत. शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करण्यात आला. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात आला. नेहरूनंतर ते आता आंबेडकर यांच्यावर बोलू लागले आहेत. रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का," असा सवाल शिवसेनेचे अध्यक्ष (यूबीटी) उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
त्यांचा जळफळाट होत राहणार- वंचितचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनी अमित शाह यांच्या विधानावरून भाजपावर पुण्यात जोरदार टीका केली. ते म्हणाले, " भाजपा आता जन्माला आलं आहे. त्यापूर्वी जनसंघ आणि आरएसएस होते. या संघटनेनं बाबासाहेबांना सर्वाधिक विरोध केला. अमित शाह यांचे वक्तव्य म्हणजे त्यांची जुनी विचारसरणी पुन्हा बाहेर पडली आहे. त्यात नाविन्य असे काही नाही. त्यांना जुने प्लॅन अमलात आणता येत नाही. त्यात काँग्रेसकडून अडसर नाही. त्यात बाबासाहेबांचा अडसर आहे. त्यामुळे त्यांचा जळफळाट होत राहणार आहे".
#WATCH | Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, " the manner in which amit shah spoke in the parliament yesterday, he displayed insolence. he said that taking ambedkar's name has become fashion and that had they taken god's name as much they would have been in heaven. who… pic.twitter.com/kqVc1KZIF6
— ANI (@ANI) December 18, 2024
- शिवसेनेचे (यूबीटी) विधिमंडळाच्या बाहेर बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजपाच्या मनातील विष बाहेर आले आहे. त्यांना संविधानाचा अपमान करायचाच होता. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायचा होता. आता भाजपासोबत असलेल्या पक्षाचे आमदार राजीनामा देणार आहेत का?".
#WATCH | Delhi: On Union Home Minister Amit Shah's speech in Rajya Sabha, Congress MP Praniti Shinde says, " bjp and rss have always hated the tricolour and the constitution... we strongly condemn this. he should apologise and resign..." pic.twitter.com/lXz2fm2lWg
— ANI (@ANI) December 18, 2024
आंबेडकर ही आमची अंतरात्म्याची आवाज- राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले," आंबेडकर हे फॅशन नाही पॅशन आहे. कुणी फॅशन म्हटले असले तर त्यांना आंबेडकर कळालेच नाहीत. आंबेडकर ही आमची अंतरात्म्याची आवाज आहे. संविधान आले नसते तर मनुस्मृती आली असती. स्त्रीयांना जगता आले नसते. देवळात जाऊ देत नव्हते. त्यांचे नाव घ्यायला सांगत आहात. जय भीमच्या नाराजीमुळे उर्जा येते. त्या बापाचे नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. नाव न घेतल्यास पुढची पिढी आम्हाला नाव ठेवेल. शोषणाविरोधात उभे राहिलेल्या लोकांसमोर प्रकाश आंबेडकर हे जगभरात आदर्श आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही बोलू शकता. त्यावरून टिंगलटवाळी करू नये. आम्हाला नरकातून बाहेर काढले. आम्हाला नोकऱ्या आणि शिक्षण बाबासाहेबांमुळे मिळाले".
हेही वाचा-